तरुणाच्या डोक्यात बिअर बाटली अन् दगड घालून खून

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी)

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली आणि दगड घालून खून करण्यात आला.शेळगी परिसरातील मित्र नगरातील नागोबा मंदिर येथील मैदानात शुक्रवारी मध्यरात्री हि घटना घडली.जोडभावी पोलिसांनी संशयित मारेकर्‍यास ताब्यात घेतले आहे.      नितीन नागनाथ उबाळे (वय-३८, रा.भीमनगर, शेळगी,सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर विशाल मोहन सुरवसे (वय-२२, रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) असे संशयित मारेकर्‍याचे नाव आहे.मयत नितीन हा मिळेल ती मजुरी करत होता.तर आरोपी हा मार्केट यार्डात हमालीचे काम करतो.संशयित आरोपी विशाल आणि नितीन या दोघांनी शुक्रवारी रात्री मद्यपाना नंतर बाहेरच जेवण घेतले. त्यानंतर पुन्हा मद्यपान करण्यासाठी त्यांनी बिअर घेतली. तसेच सिगारेट आणि काडीपेटीहि परिसरातील दुकानातून खरेदी केली.ते दोघे मित्र नगरातील नागोबा मंदिर येथील मैदानात बिअरचा आस्वाद घेत होते.त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.     दरम्यान, आरोपी विशालने हातातील बिअरची बाटली नितीनच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात नितीन जमिणीवर पडला. तेवढ्यात विशालने बाजूला पडलेला दगड उचलून नितीनच्या डोक्यात घातला. पुन्हा तोच दगड उचलून नितीनच्या डोक्यात मारला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीनला तेथेच सोडून आरोपी विशाल घरी निघून गेला.शनिवारी सकाळी येथील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.यानंतर पोलीस उपायुक्त (परिमंडल) वैशाली कडूकर,सहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी विशाल सुरवसे यास ताब्यात घेतले आहे. जोडभावी पोलीस ठाण्यात परशुराम उर्फ बाळासाहेब नागनाथ उबाळे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *