सोलापूरच्या पोलिस आयुक्तांचा दोन वर्षाचा ‘कार्यकाळ पूर्ण’ पोलीस आयुक्तांनी ठेवला गुन्हेगारांवर ‘अंकुश

सोलापूर

रोहन नंदाने / सोलापूर :

‘🔸पुढीही संधी मिळाल्यास सोलापूरकरांसाठी काम करण्यास तयार

🔸कोरोना काळात देखील बजावले आपले ‘कर्तव्य’
🔸कोरोना काळात निर्बंधाचे पालन करीत शहरात कोरोना वाढू दिला नाही

सोलापूर : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ३१ मे २०१९ रोजी सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता.त्याना ३१ मे २०२१ रोजी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहेत.पोलीस आयुक्तालयाचा आयुक्त या पदावर कर्तव्य बजावत असताना,गेल्या २ वर्षात मला सोलापूरचा नागरिक शांतताप्रिय असल्याचं दिसलं आहे.यापुढे सोलापूरकरांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी असतील तर त्यांची सेवा करण्यात धन्यताच वाटेल,असं प्रतिपादन पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांनी केले.

शहरातील सर्वसामान्य जनता सुरक्षित राहावी या हेतूने पोलिस आयुक्‍त शिंदे यांनी कधी कठोर तर कधी सयंमाने निर्णय घेतले.दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी शहरातील मटका,जुगार गुन्हेगारी, अवैध ताडी व्रिकी,अवैध वाळू वाहतूक,खासगी सावकारकी पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोनाची पहिली व दुसरी लाट आटोक्‍यात येण्यात पोलिसांचे मोलाचे योगदान राहिले.दरम्यान,कोरोनाच्या काळात अनेक महापुरूषांची जयंती,पुण्यतिथी रद्द झाली.त्यावेळीही त्यांनी संबंधित व्यक्‍तींची समजूत काढून गर्दी होऊ दिली नाही.तर पहिल्या लाटेत प्रतिबंधित क्षेत्र सील करण्याचा त्यांचा पॅटर्न राज्यभर लागू झाला.कोरोनाची दुसरी लाट कमी करून शहर सुरक्षित करण्याच्या हेतूने निर्बंध असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकारी,कर्मचाऱ्यांना दिले होते.शहरातील बरेच लोक मॉर्निंग वॉकला जात होते.कारवाईनंतर प्रमाण कमी होत गेले.परंतु,जे लोक मॉर्निंग वॉकला यायचे, त्यातील काहीजण सोबत बाजाराची पिशवी घेऊन यायचे.पोलिसांनी त्यांना हटकले तर ते म्हणायचे,आम्ही बाजारासाठी आलोय.त्यांच्या जवळील पिशवीत डोकावले असता,त्यात अवघे दोन-चार कांदे दिसले.त्यामुळे बंदोबस्त वाढवून कारवाईवर भर दिला आणि मॉनिंग वॉकला जाणे बंद झाले, असा एक अनोखा अनुभव आपल्याला आला,असेही पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी बोलताना सांगितले.

दोन वर्षात गुन्हेगारांवर कारवाई करून काढले आदेश

शहरातील ४९ व्यक्‍तींना दोन वर्षात तडीपार करीत पाच गुन्हेगारी टोळ्यांवरही त्यांनी तशी कारवाई केली. दोन वर्षात पोलिस आयुक्‍तांनी तडीपारीचे ३२ आदेश काढले.तर ५० प्रस्ताव तयार करण्यात आले असून ८० जणांना तडीपार करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.तसेच परिसरात दहशत पसरविणाऱ्या १३ गुन्हेगारांना येरवाडा कारागृहात पाठविले.२०२० मध्ये ८ तर मे २०२१ पर्यंत ५ जणांवर तशी कारवाई त्यांनी केली. 
अन् पोलिस कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता
वाळू लिलाव नसतानाही शहरातून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबली.ही कारवाई करताना त्यांनी पोलिस दलातील दोन-तीन कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखविला.अवैध मटक्‍यावरील कारवाईवेळी त्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला कायमचे घरी बसविले. गुन्हेगारांशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवून अवैध व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्यांची त्यांनी कधीच पाठराखण केली नाही.त्यामुळे शहरातील अवैध व्यवसाय बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

गुन्हा करणाऱ्यांना माफी नाहीच
पोलिस दलात काम करताना नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असते.त्यामुळे कायद्याच्या संरक्षणाचे काम करताना गुन्हेगारी वर्तन करणे,गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे, गुन्हेगारासमोर अवैध व्यवसायात भागिदारी असणे, असे प्रकार खपवून घेतले जात नाहीत.अशा अनेकांवर आतापर्यंत निलंबन व बडतर्फीची कारवाई केली आहे.यापुढेही असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत,असा इशारा पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *