पतीच्या सांगण्यावरून पत्नीवर मित्राकडून दुष्कर्म

0
172
सोलापूर  : पतीच्या सांगण्यावरून पत्नीवर पतीच्या मित्राकडून दुष्कर्म केल्याची घटना दि.८ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विजापूर रोड,सोलापूर येथे घडली.याप्रकरणी पीडित पतीच्या पत्नीने तिच्या पतीविरुद्ध व पतीच्या मित्रा विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पीडित महिलेचा पती व त्याचा मित्र यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की,हॉस्पिटल मध्ये चांगली नोकरी लावतो असे सांगून पीडित महिलेशी ओळख करून तिचा विश्वास संपादन करून व्हाट्सअप नंबर घेतला.त्यावेळी पीडित महिलेचा पती व मित्र यांनी संगनमत करून पीडित महिलेला आम्ही टेरेसवर झोपतो असे सांगितले.त्यानंतर काही वेळाने फिर्यादीच्या पतीच्या मित्राने पीडित महिला घरात झोपलेली असताना दरवाजा ढकलून तिच्या तोंडावर हात ठेवून बेडवर नेऊन तुझ्या पतीने मला तुझ्याजवळ पाठवले आहे.असे म्हणून मोबाईल वरती अश्लील स्वरूपात फोटो दाखवून पीडित महिलेशी दुष्कर्म केले.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई मस्के हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here