मित्रानेच केला मित्राच्या पत्नीवर अत्याचार

0
156
सोलापूर :  मित्रानेच मित्राच्या पत्नीवर अत्याचार करून व आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेऊन धमकी दिल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काशिनाथ सिद्रामसा बुरबुरे (वय-२८,रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पीडित महिलेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की,पीडित महिलेने काशिनाथ बुरबुरे यांच्याकडून आर्थिक अडचण असल्याने हात उसने पैसे घेतले होते.त्यावेळी काशिनाथ याने पैसे परत दे असे म्हणून पीडित महिलेच्या घरी आला व त्याने त्या पीडित महिलेच्या जवळ येऊन तू मला पैसे दिले नाही.तर मी तुझ्या नवऱ्याला तू माझ्याकडून उसने पैसे घेतले आहे असे सांगेल,अशी धमकी देऊन वेळोवेळी पीडित महिलेवर काशिनाथ याने अत्याचार केला.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बरडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here