‘अखेरचा जय महाराष्ट्र’, राजसाहेब मला माफ करा म्हणत मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या

क्राईम ताज्या घडामोडी महाराष्ट्र

नांदेडः ‘पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आहे आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत,’ अशी सुसाइड नोट लिहित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील ईरावर हे मनसेचे नांदेड शहराध्यक्ष होते. शनिवार १५ ऑगस्ट रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.

काय आहे सुसाइड नोटमध्ये?

‘राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसे आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातंय आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळं मी माझं यापुढील जीवन माझ्या मनानं संपवत आहे. तरी माझ्यामुळं कोणालाच त्रास देऊ नका.’

‘आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी मला माहितीय मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी, पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो, आई मला माफ कर- तुझाच सुनील. अखेरचा जय महाराष्ट्र.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *