मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट, सोलापूर बंद दरम्यान ATM वर दगडफेक

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात जागोजागी आंदोलनाला सुरूवात झाली आहे. अशात सोलापूर बंदला गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे. सोलापुरातील एटीएम सेंटरवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीत ब्रह्मदेव माने सहकारी बॅंकेच्या एटीएमवर दगडफेक करत आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एटीएमची तोडफोड केली केली. सकल मराठा क्रांती मोर्चाने सोलापूर बंद पुकारला होता. पण त्याला आता तीव्र वळण लागल्याचं पाहायला मिळालं आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गही आंदोलकांनी रोखला आहे

मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर समाज संतप्त झाला आहे. आज सोलापूरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे. आज सकाळी पंढरपूर-पुणे मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. निमगाव पाटी इथे टायर जाळून वाहतूक बंद केली आहे. आरक्षण प्रश्नी पंढरपूर माढा माळशिरस येथील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *