एटीएमधील सायरन वाजले अन् चोर पळाला

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर


सोलापूर (प्रतिनिधी)

दयानंद महाविद्यालय परिसरातील शनिवारी रात्री एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न झाला.एटीएम फोडत असताना एटीएममधील सायरन वाजले आणि चोराने तेथून पळ काढला. दरम्यान बँकेने पोलिसांशी संपर्क साधून रात्री घटनेची माहिती दिली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.     दयानंद महाविद्यालय आणि जोडभावी पोलीस ठाण्याच्या परिसरात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम सेंटर आहे.शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केला.हत्याराचा साह्याने एटीएम फोडतेवेळी सायरन वाजले.बँकेच्या मुख्य शाखेतहि सायरनचा आवाज आला.यामुळे बँकेतील सुरक्षा रक्षकाने अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली.दरम्यान,अधिकार्‍यांनी जोडभावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.या एटीएम सेंटरमध्ये आठ लाख रोकड होती अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यानी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *