अर्जुनच्या गर्लफ्रेंडच्या भावाचं बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं जाळं; व्हॉट्सअप चॅटमधून खुलासा

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियाओस डेमेट्रिएड्सने एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मदतीनं बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं जाळं पसरवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनपासूनच अगिसियाओस डेमेट्रिएड्स आपल्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईतील खार परिसरात राहत होता.

एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अगिसियाओस भारतातून विदेशात ड्रग्स निर्यात करण्याच्या तयारीत होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितं की, ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केल्यानंतर अगिसियालोसचा मोबाईल ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने त्याचं व्हॉट्सअॅप चॅट रिट्रीव केलं आहे.

व्हॉट्सअॅप चॅट्सच्या विश्लेषणादरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीमधून अगिसियालोस एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी निगडीत होता आणि ऑस्ट्रेलियन, कोलंबियन, साऊथ आफ्रिकन आणि साऊथ कोरियन ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता.

अगिसियालोस अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही संपर्कात होता आणि त्यांच्या मागणीनुसार तो ड्रग्स कधी ऑस्ट्रेलिया, कोलंबिया किंवा कधी साऊथ आफ्रिकेमधून मागवत होता. तसेच त्यांना योग्य त्या सवलतीत विकत होता.

अगिसियालोस लोकांना कोकेन, एमडी (मेफेड्रिन), हशीश, वीड, अल्प्राजोलम यांसारख्या ड्रग्स उपलब्ध करुन देत होता. अगिसियालोस, ड्रग पेडलर पॉल कॅरेटच्या मदतीने विदेशात चरस, वीड आणि मनाला क्रिमचा सप्लाय करत होता, अशी माहितीही मिळाली आहे.

दरम्यान, अगिसियालोस एक साउथ आफ्रिकन नागरिक आहे. तो टूरिस्ट व्हिजावर भारतात आला होता. अगिसियालोस सध्या जामीनावर बाहेर आहे. अगिसियालोस सध्या जामिनावर बाहेर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने याचसंदर्भात अर्जुन रामपालला चौकशीसाठी दुसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. अर्जुन रामपालनं एनसीबीकडे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी 22 डिसेंबरपर्यंतचा वेळ मागितला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *