३० हजारांसाठी मित्रानेच केले मित्राचे अपहरण

0
142

सोलापूर : तीस हजार रुपयांसाठी मित्रानेच मित्राचे अपहरण केल्याची घटना सोलापुरात बुधवारी घडली आहे.विशाल पाटील असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून,याबाबत गुरुवारी रात्री सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत आरोपींना विजापूर येथून अटक केली आहे.

विशाल हे चार तारखेला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दवाखान्याला जातो असे सांगून घरातून गेले.त्यानंतर ते रात्री घरी आले नाही.दरम्यान विशाल यांच्या आईंच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी फोन करून तीस हजार रुपयांची मागणी केली व ही घटना पोलिसांना सांगितल्यास विशालला ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी विशालची पत्नी पूजा पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी बारा तासाच्या आत आरोपींना अटक केली.ही कारवाई पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई अल्फाज शेख,पोलीस हवालदार खाजप्पा आरेनवरु,पोलीस नाईक दयानंद वाडीकर,पोलीस कॉन्स्टेबल गणेश कानाडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here