भारतीय अणवस्त्रांच्या निशाण्यावर पाकिस्तान नव्हे तर….. देश!

देशविदेश

वॉशिंग्टन: लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने आपल्या अणवस्त्र सुरक्षा रणनितीमध्ये बदल केला आहे. अमेरिकन थिंकटँकच्या अहवालानुसार, भारताच्या अणवस्त्रांच्या निशाण्यावर कायम पाकिस्तान होता. आता चीनसोबतच्या वादानंतर भारताने आपल्या सुरक्षा योजनेत बदल केला असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
बुलेटिन ऑफ एटॉमिक सायंटिस्टमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारत आणि चीनमध्ये 2017 मध्ये डोकलाममध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भारताने अणवस्त्र रणनितीनुसार चीनवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याशिवाय, भारत कमीत कमी तीन शस्त्रांची निर्मिती करत असून चीनविरोधात मोठे बळ मिळणार आहे. रिपोर्टनुसार, याआधी भारताचे अणवस्त्र धोरण सुरक्षात्मक दृष्टीने होती. आता मात्र, या धोरणात बदल झाला असून आक्रमक धोरण भारताने स्वीकारले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाचे लेखक हेन्स ए. क्रिस्टेंट आणि मॅट कोर्डा यांच्यानुसार, भारताने 150 ते 200 अणूबॉम्बसाठी वापरण्यात येणार्‍या प्लुटोनियमचा साठा करून ठेवला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारताच्या निशाण्यावर चीनची राजधानी बीजिंगही आली आहे.
या अहवालानुसार, भारताजवळ अणूबॉम्ब फेकण्याची क्षमता असणारी आठ क्षेपणास्त्रे आहेत. यामध्ये हवेतून हल्ला करण्यास सक्षम असलेली दोन, जमिनीवरून हल्ला करता येणारी 4 बॅलेस्टीक क्षेपणास्त्र आणि दोन समुद्र आधारीत असलेली बॅलेस्टीक क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश आहे. त्याशिवाय कमीत कमी तीन क्षेपणास्त्रे विकसित होत आहेत.
दरम्यान, चीन अतिशय वेगाने आपल्याकडील अणवस्त्राचा साठा वाढवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चीन आता पहिल्यांदा जमीन, हवा आणि समुद्रातून डागण्यात येणार्‍या अणवस्त्रांची निर्मिती करत आहे. तर, दुसरीकडे भारतानेही पाकिस्तान आणि चीनच्या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी कंबर कसली असून अणवस्त्रांची संख्या वाढवत आहे. जगभरातील अणवस्त्रांबाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था ङ्कसिप्रीङ्खच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. भारत आणि चीनने मागील वर्षीच आपल्या अणवस्त्रांच्या साठ्यात वाढ केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताकडील अणवस्त्रांची संख्या ही चीनच्या तुलनेत निम्मी आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 आणि चीनकडे 320

पाकिस्तानकडेही भारताच्या तुलनेत अधिक अणूबॉम्ब असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानकडे 160 अणूबॉम्ब आहेत. पाकिस्तानकडे भारताच्या तुलनेत अधिक अणवस्त्र असली तरी भारतीय अधिकार्‍यांना आपल्या अणवस्त्रविरोधी क्षमतेवर विश्वास आहे. आशियातील या तीन देशांमध्ये अणवस्त्रांची संख्या वाढत असताना जगात मात्र अणवस्त्रांच्या संख्येत घट होत आहे. जगातील एकूण 90 टक्के अणवस्त्रे असलेल्या अमेरिका आणि रशिया आपल्याकडील अणवस्त्र नष्ट करत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *