पोलीस आयुक्तांचा दणका, हवलदार कांबळेसह पोलीस कॉन्स्टेबल अडगळे निलंबित

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) सौरेगाव येथील एम एम कलशेट्टी यांच्या मालकीच्या शेतजमिनीत तिक्रमण काढण्याच्या उद्देशाने उद्योगपती राम रेड्डी यांच्या सांगण्यावरून विनोद संदीपान चुंगे,सागर नील कदम,सुरज बबनराव शिखरे,फैजअहमद सैफन ढाले आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी तजमिनीवरील तारेचे कुंपण नष्ट केले.त्याला विरोध करणाऱ्या वॉचमनला टोळीतील एकाने हातातील तलवारीचा धाक दाखवून त्याचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.

हा प्रकार समजल्यानंतर शेतमालक एम.एम कलशेट्टी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून टोळीविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासात कांबळे व अडगळे यांचे नावे निष्पन्न झाली.अटक होणार या भितीने अडगळे याने येथील पोलिसांची नगर चुकून पोलीस ठाण्याच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढला.तर कांबळे त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.दरम्यान या प्रकरणी हवालदार जयप्रकाश कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल किर्तीराज अडगळे यांना पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करत दोघांना निलंबित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *