सुशांतच्या अकाउंटमधून अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचा जात होता EMI

ताज्या घडामोडी मनोरंजन

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू संदर्भात तपास करणाऱ्या ईडीने धक्कादायक माहिती दिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या अकाउंट मधून त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचे ईएमआय कट होत असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितली आहे. हा फ्लॅट सुशांत सिंह राजपूतच्या नावावर बुक आहे. अंकिता लोखंडे हिचा हा फ्लॅट मालाडमध्ये आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. दरम्यान, या प्रकरणी रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस केसचा गुंता वाढत आहे. अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि न्याय मागण्यासाठी कुटुंबासोबत सर्वात पुढे आहे. यासोबत सुशांत संदर्भात अनेक टिव्ही चॅनल्सला मुलाखती दिल्या आहेत.

सुशांत आणि अंकिता जवळपास सहा वर्षे एकमेकांसोबत नात्यामध्ये होते. सुशांत सोबतच्या ब्रेक अपनंतर अंकिता बिजनेसमॅन विक्की जैन सोबत रिलेशीनशीपमध्ये गेली. तर सुशांतने रिया चक्रवर्तीसह नवीन आयुष्याला सुरुवात केली.

सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला मुंबई मधील आपल्या अपार्टमेंट मध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने सुद्धा याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे.

सुशांत सिंह राजपूतचे वडिलांनी पाटणामध्ये एफआयआर नोंदवली आहे. यात सुशांतची पूर्वश्रमीची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावरती आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासह फसवणुकीचा आरोप लावला आहे. या तक्रारीविरोधात रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *