अनिल अंबानी कंगाल; वकिलाला फी देण्यासाठी दागिनेही विकले!

ताज्या घडामोडी देशविदेश मुंबई

वी दिल्ली : देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे उद्याेजक अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याचं समोर आलं आहे. वकिलाला फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयाला दिली आहे. अनिल अंबानी यांच्याकडून 5281 करोड रुपये वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी अंबानी यांच्याविरोधात खटला भरला आहे. या खटल्यावर लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांनी दागिने विकल्याची माहिती न्यायालयाला दिली.

अनिल अंबानी यांनी 9.9 करोड रुपयांचे दागिने विकले

अंबानी यांनी न्यायालयामध्ये म्हटलंय, की “जानेवारी ते जून 2020 दरम्यान मी 9.9 करोड रुपयांचे दागिने विकले. आता माझ्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू नाही.” तसेच आपल्याकडे महागड्या गाड्याही नसल्याचा दावाही त्यांनी केल्याचा सूत्रांनी सांगितलं. माझ्याकडे रोल्स रॉयल्स कार नसून, मी साधी कार वापरतो, असंही त्यांनी सांगितलं आहे.

खात्यात फक्त 20.8 लाख रुपये

अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2019 ला त्यांच्या खात्यात 40.2 लाख रुपये होते. तर 1 जानेवारी 2020 ला त्यांच्याकडे फक्त 20.8 लाख रुपये शिल्लक राहिले.दरम्यान, अंबानी (Anil D Ambani) यांनी “माझ्याकडे आता कमाईचे दुसरे कोणतेही साधन नाही. माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीयच माझा सर्व खर्च उचलतात.” असही त्यांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे धनाढ्य उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे अनिल अंबानी यांच्यावर दागिने विकायची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंबानी यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी शक्य तितक्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असल्याचं चिनी बँकांनी म्हटलंयअनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचं एकूण 12,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. अंबानी 2008 मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपने येस बँकेचं 2,892 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्याने बँकेने सांताक्रूजमधील (मुंबई) 21,000 चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मुख्यालय इमारत आणि दक्षिण मुंबईमधील नागिन महलमधील दोन मजल्यांचा ताबा येस बँकेने जुलै महिन्यात घेतलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *