ड्रग्ज कनेक्शनमध्ये अक्षय कुमारही? NCB च्या तपासात A नाव समोर येताच माजली खळबळ

ताज्या घडामोडी मनोरंजन

मुंबई : अभिनेता सुशांत राजपूत मृत्यू (Sushant singh rajput) प्रकरणात ड्रग्ज अँगलने (drug) तपास करणाना आधी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) अटक झाली.  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) पुढील तपासात D, N, S, K अशी अभिनेत्रींची नावं समोर आली. त्यानंतर आता दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तीन अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरू आहे. यापाठोपाठ आता आणखी तीन बडे अभिनेते एनसीबीच्या रडावर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार एनसीबीला A, R आणि S अशी नावं सापडली आहेत. A नाव समोर येताच अक्षय कुमारच्या (Akshay kumar) नावाने चर्चा सुरू झाली आहे.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार एनसीबी आता लवकर A, R आणि S या नावाच्या अभिनेत्यांची चौकशी करणार आहे. या तिनिही सुपरस्टार्सनी अभिनेत्री दीपिका पादुकोणसह काम केलं आहे, असंही या रिपोर्टमध्ये सांगितलं जातं आहे. A नावाचा सेलिब्रिटी स्वत: ड्रग्ज घेतो आणि इतरांनाही देतो, असा दावा केला जातो आहे.A नाव समोर येताच बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमारच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोणने तीन फिल्ममध्ये काम केलं आहे. चांदनी चौक टू चायना, हाऊसफुल आणि देसी बॉयज या फिल्ममध्ये ते एकत्र होते. शिवाय ओम शांती ओममध्येही अक्षय कुमार दिसला होता.

त्यामुळे A म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही तर अक्षय कुमारच आहे असा अंदाज सोशल मीडियावर बांधला जातो आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अक्षय कुमारसाठी त्याचे चाहते लगचेच धावून आले. सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून आपल्या आगामी फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. बेलबॉटमचं शूट सुरू होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *