कोइम्बतूर
कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर कस्टम विभागाने दोन महिलांना अंडरवेअरमध्ये तब्बल 62 लाख रुपये किंमतीचे 1.1 किलोग्रॅम सोनं जप्त केलं आहे. यानंतर दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.सीमा शुल्क विभागाने सांगितले की, हवाई अड्ड्यावर दोन महिलानी घातलेल्या अंडरवेअर्समध्ये 62 लाख रुपयात 1.1 किलोग्रॅम सोन्यासह तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांची नावे देवनावी राधाकृष्णन आणि वासंती रामास्वामी अशा आहेत. सकाळी 3.30 वाजता एअर अरबच्या उड्डाणात शारजाह ते कोयुम्बतूर पोहोचली होती.
गुप्त सूचनाच्या आधारावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मेटल डिटेक्टरचा उपयोग करून त्यांचा तपास केला आणि त्या महिलांनी ज्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर केला होता त्यात पेस्ट रुपात सोन्याची तस्करी केली होती. यानंतर तातडीने त्यांना ताब्यात घेण्यात आलं.या दोन्ही महिलांशिवाय त्या फ्लाइटमधून शहरात येणारे पाच जणं 46 लाख रुपयांचं सोनं, दारू आणि सिगारेटसह पकडले गेले. त्यापैकी दोन चेन्नईपासून दोन पट्टीनमपासून आणि एक इल्यांगुडी येथे राहणारे होते.
यादरम्यान बुधवारी कोच्चीच्या एका सत्र न्यायालयाने राजकीय चॅनलच्या माध्यमातून राज्यात सोन्याच्या तस्करीशी संबंधित एका प्रकरणात केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी प्रमुख सचिव एम शिवशंकर यांची अटक वाढविण्यात आली आहे. ईडीने 28 ऑक्टोबर रोजी शिवशंकर यांना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्याजवळील 30.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं, ज्याची किंमत 14.82 कोटी रुपये होती.