Air India च्या विमानांना हाँगकाँगला जाण्यास बंदी; चिनी सरकार निर्णय

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : भारताची सरकारी एव्हिएशन कंपनी एअर इंडिया (Air India) ला दोन आठवड्यांसाठी हाँगकाँगला उड्डाण करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीहून हाँगकाँग (Hong Kong) साठी नियमित उड्डाण करणाऱ्या  एअर इंडिया (Air India) वर चिनी सरकारने रोख लावला आहे.

ज्यामुळे सोमवारी उड्डाण करणारं एअर इंडियचं विमान हाँगकाँगला गेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार सांगितले जात आहे की हाँगकाँगहून परतलेली फ्लाइटदेखील दिल्लीला आलेली नाही. 14 ऑगस्ट रोजी संचालित एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग फ्लाइटमध्ये 11 कोविड -19 चे रुग्ण समोर आले होते, ज्यानंतर चिनी सरकारने हाँगकाँगसाठी एअर इंडियाच्या उड्डाणांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण चायना मॉर्निंग पोस्ट (South China Morning Post) च्या एका रिपोर्टनुसार, हाँगकाँगने एअर इंडियाच्या पुढील फ्लाइट ऑपरेटिंगवर निर्बंध लावले आहेत. अनेक कोरोना रुग्णांना हाँगकाँगमध्ये आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी एअरलाइन्सने यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार दिल्ली-हाँगकाँग फ्लाइट स्थगित करण्यात आलं आहे. चिनी सरकारच्या या निर्णयामुळे भारतात अडकलेल्या हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. प्रवाशांनी सोशल मीडियावर ट्रॅव्हल प्लान रिशेड्यूल करण्यास सांगितले आहे. एका प्रवाशाने ट्विटचं उत्तर देत राग व्यक्त केला आहे. हाँगकाँग अधिकाऱ्यांनी लावलेल्या प्रतिबंधांमुळे एआय 310/315, दिल्ली हाँगकाँग-दिल्लीची 18 ऑगस्ट 2020 ची फ्लाइट स्थगित झाली आहे. याबाबत लवकरच माहिती शेअर करण्यात येईल. यासाठी प्रवाशांनी एअर इंडियाच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *