सिमेंट टॅंकर व दुचाकीच्या भीषण अपघाता,दोन तरुणांचा मृत्यू

ताज्या घडामोडी सोलापूर

साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोघांवर काळाची झळप

सोलापूर, : साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांवर काळानं झळप घातली. पाटखळ-खुपसंगी मार्गावर सिमेंट टॅंकर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात खोमनाळ येथे शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली.चंद्रकांत वराडे (वय-62) आणि संध्या वराडे (वय-58) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत.

मिळालेली माहिती अशी की, गोविंद आणि चिल्लपा हे दोघे खोमनाळ हिवरगाव येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याला गेले होते. ते परत बुरुंगेवाडीकडे येत असताना पाटखळ गावाजवळ त्यांच्या दुचाकीला सिमेंट वाहून नेणाऱ्या टँकरनं जोरदार धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की, गोविंद आणि चिल्लपा जवळपास 20 फूट अंतरावर फेकले गेले. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेनंतर बुरुंगेवाडी जवळा येथे शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *