आगीत मारुती कार जळून झाली खाक

0
102
जनसत्य  प्रतिनिधी
कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे सोमवार सकाळ दहाच्या सुमारास पेट्रोलवरील मारुती अल्टो कारला वाहनाच्या आतील बिघाडामुळे आग लागली. या आगीत मारुती कार जळून खाक झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून या कारमधून पाचजण प्रवास करत होते.श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने शेळगी सोलापूर येथील रहिवासी सिध्दाराम चन्नाप्पा कोळी यांच्यासह एक लहान मुलगा व तिन महिला हे एम. एच. ४५ ए. २४६८ या क्रमांकाच्या वाहनाने मंगळवेढा तालुक्यातील माचनुर गावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यांच्या दर्शनासाठी जात असताना, कामती बुद्रुक गावानजीक उड्डाणपुलाच्या शेजारी गाडीने आतील बिघाडामुळे अचानक पेट घेतल्याने ही घटना घडली आणि यात सर्वच प्रवाशानी सावधगिरी बाळगत वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.याची माहिती कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना मिळताच त्यांच्यासह पो.का सुनिल पवार, जगन इंगळे, पो.ना. परमेश्वर जाधव, राहुल दोरकर यांनी घटनास्थळी भेट दिली व तात्काळ दिलीप बिल्डकॉम कंपनीच्या पाण्याचा टँकरच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यात गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here