अंतयात्रेस गर्दी ; ३५ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) अंतयात्रेस बेकायदेशीरपणे जमाव जामून गर्दी केल्याप्रकरणी ३५ जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटणा दि. ३० मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक सोलापूर येथे घडली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण नामदेव जाधव यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून किसन चंद्रकांत मंजेली,यल्लाप्पा सिद्धराम मंजेली,चंद्रकांत राम मंजेली,गणेश गंगाधर मंजेली,अक्षय मारुती गुजराती (सर्व.रा.रविवार पेठ,सोलापुर यांच्यासह २५ते ३० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की,मयताच्या अंत्ययात्रेस वीस पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असताना,दि. ३० मे रोजी मयत अजय चंद्रकांत मंजेली (वय-२२,रा.रविवार पेठ सोलापूर) यांच्या अंत्ययात्रेस यात्रेस बेकायदेशीरपणे जमाव जमून एकत्र येऊन कोरोना विषाणू संसर्ग पसरविण्याचे कृत्य केले.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटणेची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक मनोरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *