‘ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर डिन्स्पेन्सर मशिन’ची केली निर्मिती

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूरच्या सुपुत्राची किमया: सॅनिटायझर मशिनला देशभरातून मागणी

सोलापूर : करोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझरचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. परंतु सॅनिटायझरची बाटली वारंवार हाताळण्याऐवजी सेन्सरद्वारे सॅनिटायझर मिळण्याकरिता सोलापुरातील एका युवकाने ‘ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर डिन्स्पेन्सर मशिन’ची निर्मिती केली आहे. त्याची ही मशिन बाजारात अाली असून तिला देशभरातून मागणी होत अाहे. मशीन तयार करण्यासाठी स्वतःची डोकॅलिटी आणि गुगलवरील ज्ञानाचा उपयोग केला. लॉकडाऊन काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत ही मशीन तयार करणार्‍या युवकाचे नाव अाहे सुप्रीत अनिल रायचूरकर.

३१ वर्षीय सुप्रीत हा शहरातील अयोध्यानगर, बुधवार पेठ परिसरात राहणारा. पुणे विद्यापीठातून बी. ई. ऑटोमोबाईल्स चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पुण्यातील एका कंपनीत डिझायनर म्हणून रुजू झाला. ३ वर्षापूर्वी सोलापुरात बिझनेस करावा या हेतूने त्याने आपले घर गाठले. पुढे करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी लॉकडाऊन लागू झाले. घरात बसून काहीतरी करावे असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. याच काळात सॅनिटायझरचा वापरही वाढला होता. विशेष म्हणजे या बॉटल ला हात न लावता टचलेस सॅनिटायझर मशीन कशी तयार करायचे यावर तो विचार करू लागला.

मशीन तयार करण्यासाठी यूट्यूब आणि गुगलचा आधार घेतला. त्यांचे वडील आर्किटेक्चर अनिल रायचूरकर यांच्यापासून प्रेरणा घेत त्याने ‘ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर डिन्स्पेन्सर मशिन’ची निर्मिती केली. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत अथक परिश्रम केल्यानंतर ही मशीन तयार झाली. यासाठी अत्यल्प खर्च आला.
अल्ट्रासॉनिक सेन्सर, मायक्रो कंट्रोलर, पंप रिले, पॉवरबँक, प्लास्टिक डबा, माउंट बोर्ड पाच होल्ट डीसी मोटर याचा वापर करत एक मिली लिटर क्षमतेचे सॅनिटायझर मशीन तयार केली आहे. मोबाईल चार्जरचा वापर करून ते चार्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मशिनमध्ये बसविलेल्या तोटीसमोर हात नेले की, आपोआप सॅनिटायझर हातावर पडेल अशा पद्धतीची रचना आहे. यू ट्यूब आणि गुगलचा वापर करून माहिती घेत सुरवातीला तयार केलेल्या मशीनचे आयुर्मान कमी होते. यात काही अंशी त्याचा तोटाही झाला. त्यानंतर त्याने मशीनमध्ये पुन्हा स्वत:ची डोकॅलिटी वापरत काही बदल करत नव्या रुपात मशीन तयारी केली. जूननंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ही मशीन त्याने बाजारात विक्रीस आणली. आज या मशीनला गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई अाणि नागपूर सारख्या जिल्ह्यांतून मागणी होत आहे.

कोट

मशीनची किंमत माफक दरात

लॉकडाऊन काळात माझ्याकडे प्रचंड वेळ होता या वेळेचा सदुपयोग करत मी ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर डिन्स्पेन्सर मशिन’ची निर्मिती केली अाहे. टचलेस मशिन ला सध्या सोलापूर शहर देशभरातून मागणी येत आहे. याची किंमत ही सर्वांना परवडेल अशी आहे. तसेच नोटा सॅनिटायझर करणारी मशीन देखील त्याने तयार केली आहे.

सुप्रीत रायचूरकर
डिझायनर  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *