मंगळवेढ्यात कोरोनाबाधित रूग्णाला रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रूग्णाचा वाटेतच मृत्यू

ताज्या घडामोडी सोलापूर

या घटनेची चाैकशी करून दाेषीवर कारवाईची हाेतेय मागणी …!

मंगळवेढा (प्रतिनिधी )

मंगळवेढा तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवल वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत तालुक्‍यातील गणेशवाडी येथील एका 40 वर्षीत व्यक्तीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवेढा येथील ग्रामीण  रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान येथील डॉक्‍टरांनी त्यांना सोलापूर येथे उपचाराला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला खासगी वाहनाने उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्‍यात आरोग्य व्यवस्थेचा भाेगळ कारभार उघड झाला आसुन या घटनेच्या चाैकशीची मागणी हाेत आहे.

तालुक्‍यात कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यापासून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहे. आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असतानाही उपलब्ध मनुष्यबळाच्या साह्याने प्रशासन कोरोनाचा सामना करत आहे. शहरात असलेल्या कोविड सेंटरमधे गैरसोयीबद्दलचे संचार मधे पाठीमागे  वृत्त प्रसिद्ध करताच स्वच्छता व आहार पुरवठ्याकडे लक्ष दिले. जि.प.मुख्याधिकारी यांनी भेटही दिली परंतु मधुमेह व रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सेंटरमध्ये ऑक्‍सिजनची सुविधा नसल्यामुळे या सेंटरमधील पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यात रूग्णांचे आर्थिक नुकसान होत आहे. गत आठवड्यात झालेल्या पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीमध्ये याबाबतची मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने सध्य परिस्थितीचा विचार करता आक्रमक पावले उचलणे आवश्‍यक होते. तशी आक्रमक पावले उचलली नसल्यानेच  आजच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
गणेशवाडी येथील 40 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सकाळी साडेदहा वाजता मंगळवेढ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जादा त्रास होऊ लागल्यामुळे येथील डॉक्‍टरांनी त्याला उपचारासाठी सोलापूरला घेवून जाण्याला सल्ला दिला. परंतु जवळपास एक तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे तासाभराने खाजगी वाहनांचा आधार घेत त्या व्यक्तीला उपचारासाठी सोलापूरला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कोरोना चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मृतदेह त्याच्या गावी नेत असताना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगून तो रस्त्यातून परत मंगळवेढ्यात आणण्यात आला.

जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप म्हणाले, तालुक्‍याची लोकसंख्या व रूग्णसंख्या विचारात घेता भविष्यात इतर ठिकाणी उपचारासाठी गेल्यावर येणाऱ्या अडचणी ऐवजी प्रशासनाने दोन रुग्णवाहिका व ऑक्‍सिजनचा पुरवठा यासह कोविड हॉस्पिटल तातडीने उभा करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने लक्ष द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *