त्या निलंबित पोलिसांसह चाळीस जनावर गुन्हा दाखल,बोकड पार्टी पोलिसांसह गावकऱ्यांना भोवली

क्राईम पंढरपूर

मंगळवेढा : कोरोनाच्या आपत्तीच्या काळात गावात गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन करून साथीचे रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असतानाही जाणीवपुर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रकरणी तो कैदी, दोन निलंबित पोलिस व पार्टीच्या आयोजकासह आंबे (ता पंढरपूर) येथील जेवण पार्टीस हजर असणाऱ्या ३० ते ४० जणांवर पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शिवाजी बळीराम भोसले यांनी जेवणाची पार्टी आयोजित केली होती सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग असताना शासकीय आदेशाचे उल्लंघन करून साथीच्या रोगाचा फैलाव होईल याची कल्पना असताना सुद्धा जाणीवपूर्वक बोकड कापून जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला.हा कार्यक्रम सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यत सुरू होता या पार्टीस गावातील ३० ते ४० नागरिक उपस्थित होतें त्याचबरोबर सबजेलमध्ये अटकेत असलेला तानाजी बळीराम भोसले यास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे जेलमधील ड्युटी वरील कर्मचारी बजरंग माने व उदय ढोणे यांनी पार्टीस आणले.

त्यामुळे. भा.द.वी कलम १८८,२६९, २७० सह आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१(ब) , भारतीय साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम ३(१) (अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे त्या कैद्यासह दोन निलंबित पोलीस व पाटीर्चे आयोजन करणाऱ्या शिवाजी बळीराम भोसले याच्यावर पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्याद आंबे गावचे तलाठी प्रकाश तानाजी गुजले यांनी दिल्याने पंढरपूर पोलीस ठाण्यायात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *