2024 ला आम्ही एकाच इंजिनवर येणार, फडणवीसांकडून युतीच्या चर्चेला पूर्णविराम

0
102

पुणे,  : गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत भेटीगाठीचे सत्र घडल्यामुळे राज्यातील राजकारणात नव्याने भाजप आणि शिवसेना युतीची  चर्चा रंगली आहे. पण, 2024 च्या निवडणुकीत आम्ही एकाच इंजिनवरच येणार आहोत, असं महत्त्वाचं विधान भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे मेट्रो  मार्गाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असता फडणवीस यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

ज्या प्रकारे मेट्रोला एकच इंजिन असते. मेट्रोला  डबल इंजिनची आवश्यकता नाही, तसंच आम्ही 2024 च्या निवडणुकीत पण आम्ही सिंगल इंजिनवरच येणार आहोत’, असं म्हणत फडणवीस यांनी युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

तसंच, देशाला पुढं नेण्यासाठी चांगल्या कंडक्टरची गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर फडणवीस म्हणाले की, ‘हा उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव आहे, टिप्पणी का कमेंट आहे, हे बघावे लागेल.’

‘आज उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या पक्षाने कशा शुभेच्छा द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, पण नवीन पिढीला शुभेच्छा दिल्या पाहिजे. परंपरेने नेतृत्त्व पुढं येत असेल तर त्यांनी अनुभव घेतला पाहिजे’, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.मी मुख्यमंत्री असताना आणि पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेली पुणे मेट्रो प्रगती पथावर आहे याचं मोठं समाधान आहे. यात श्रेयवाद नाही. ही मेट्रो पुणेकरांची पुणेकरांसाठी असेल, असंही फडणवीस म्हणाले.दरम्यान, फडणवीस यांनी आज शिवाजीनगर आणि स्वारगेट भागातील मेट्रोच्या  भुयारी मार्गिकेची ते पाहणी केली. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हजेरीत मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आले होते. मात्र त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना ऑनलाईन सुद्धा बोलवलं नव्हते. पंतप्रधान मोदींचा फोटो ही लावला नाही म्हणून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here