14 जुलै 2020 मेष: शुभ रंग: केसरी, शुभ दिशा:उत्तर

नम‘ता व व्यवहार कुशलता आपल्याला प्रत्येक कामात यश देईल. विरोधकांपासून सावध रहा. कौटुंबिक समस्या दूर होईल.
वृषभ: शुभ रंग:पांढरा, शुभ दिशा: पूर्व
कार्यक्षमतेत वाढ झाल्याने कठिण कामात देखील यश मिळेल. शंका कुशंका निर्माण होऊ देऊ नका. कौटुंबिक जिवन सुखी व आनंदी राहील. मिथुन:शुभ रंग:काळा, शुभ दिशा:उत्तर
व्यापारिक वाद संपुष्टात येतील. कुटूंबात आनंदाचे वातारण येईल. साहस, पराक‘माचा फायदा होईल. सहचरणी सोबत आर्थिक विषयांवर वाद होऊ शकतात.
कर्क : शुभ रंग : हिरवा, अनुकूल दिशा : पूर्व
आर्थिक योजनांवर चर्चा होईल. स्थायी मालमत्तेची खरेदी:विक‘ी संभव आहे. सामाजिक कार्यात आपले योगदान राहील. व्यापारीक निर्णयात गोपनीयता बाळगा.व्यापार:व्यवसाय चांगला चालेल. स्वतःचे निर्णय प्रभावी ठेवा.सिंह : शुभ रंग:लाल, शुभ दिशा:उत्तर
एखादे राहिलेले काम पूर्ण झाल्याने आनंद होईल. नोकरीत सहकार्याकडूंन मदत मिळेल. मुलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल
कन्या: शुभ रंग: गुलाबी, शुभ दिशा:पूर्व
सामाजिक कामात रस वाटेल. आपला सल्ल्याला महत्व मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नौकरीमध्ये आपले स्थान बळकट होईल.
तुळ: शुभ रंग : निळा, अनुकूल दिशा : पूर्व
सामान्य कामासाठी दिवस चांगला राहण्याची शक्यता आहे. अनिश्चितेची परिस्थिती समाप्त होईल. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक: शुभ रंग : काळा, अनुकूल दिशा : उत्तर
चांगल्या मित्रांचा संपर्क फायदेशीर राहील. प्रतियोगितामध्ये आपल्याला विजय मिळेल. व्यवसायाची प्रगती होईल. मुलांच्या कामकाजावर लक्ष ठेवा.
धनु: शुभ रंग : पिवळा, अनुकूल दिशा : उत्तर
अथक मेहनत करुनही फळ कमी प्रमाणत मिळेल. सामान्य गोष्टींवत सुद्धा परिणामांवर ध्यान ठेवा. मानसिक अषस्थरतेमुळे कामात अडचणी येऊ शकतात. व्यापार मध्यम राहील.
मकर: शुभ रंग : गुलाबी, अनुकूल दिशा : पूर्व
एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख:साधनांची आवड निर्माण होईल. अनावश्यक राग करु नका. यात्रा सुखात होण्याचे योग येतील.
कुंभ: शुभ रंग : जांभळा, अनुकूल दिशा : पूर्व
धार्मिक प्रवृत्ती वाढेल. आपल्यात असलेले गुण व योग्यता यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. सर्व कामे सुरळीत पार पडतील. व्यावसायीक निर्णय घेण्याची घाई करू नका.
मीन: शुभ रंग:हिरवा: शुभ दिशा:दक्षिण
नवीन संबंधाबाबत जागृत रहा. जिद्द धरू नका नुकसान होईल. साथीदाराच्या सामाजिक स्थितीची चिंता वाटेल. अजिवीका क्षेत्रात अडचणी येतील.
14 जुलैला जन्मलेल्या लोकांचा भविष्य
स्वभाव : तुमच्या जन्मतारखेवर सुर्य, हर्षल व बुधाचा प्रभाव आहे. तुमची बुध्दी त‘ख आहे. अनेक विषयात तिला गती असल्याने साहजिकच तुमचे व्यक्तिमत्व अष्टपैलू बनते. तुमची आकलनशक्ती, ग्रहणक्षमता उत्तम आहे. बौध्दीक पातळीवर कुठल्याही समस्येचे आकलन तुम्हाला चटकन होते. बुध्दीला पटल्याखेरीज कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नसला तरी इतरांच्या भावनांना तुम्ही जपता. लोकांशी ओळखी करायला, त्यांची सुखदु:खे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असता. काव्य, शास्त्र, विनोदात जास्त रमता.
घेतलेल्या निर्णयांना चिकटून रहा. अनेक क्षेत्रातील उडती व वरवरची माहिती जमा करण्यापेक्षा त्याच्याच जोडीला निश्चित विषयाचा दीर्घ व्यासंग जास्त लाभदायक ठरेल. अति बौध्दिक श्रमांचा ताण मेंदूवर, मज्जासंस्थेवर पडू देऊ नका. आहारात ’ब’ जीवनसत्वाचा वापर आवश्यक आहे.
कार्यक्षेत्र : बौध्दिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणे तुम्हाला सोपे जाईल.
पत्रकारिता, जाहिरात माध्यमे वगैरे प्रांतात तुमचे भाषाप्रभुत्व उपयोगी पडू शकेल. वाड्.मयीन पुस्तकांचे लेखन, मुद्रण, प्रकाशन या क्षेत्रातही पाय रोवू शकाल. उत्पादनांच्या एजन्सी वितरण, दूरसंचार, इंटरनेट, ई-कॉमर्स ही क्षेत्रेही अनुकूल ठरतील. कंपन्यांचे हिशेब सांभाळणे, करस‘ागार यातही प्रावीण्य मिळवू शकाल.
प्रणयी जीवन : आपल्याला सखोलपणे समजून घेऊ शकेल असा जोडीदार तुम्हाला हवा असतो. शारीरिक सौंदर्याबरोबरच त्याची बौध्दीक क्षमता, विचार करण्याची कुवतही तुम्हाला अपेक्षित असते. तो रसिक वृत्तीचा असला तरी शरीर सुखांच्या पाठीमागे धावणारा नसावा असे तुम्हाला वाटते. मे 21 ते जून 20 दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती या अपेक्षा पुर्या करतील.
वर्षफळ : आपल्या कुटुंबापासून व्यवसायानिमित्ताने काही काळ दूर राहावे लागेल. त्यामुळे साहजिकच कौंटुबिक खर्चात भर पडेल. जुलै ऑगस्ट मध्ये सत्तेपासून काही काळ दूर रहावे लागेल. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये वकिली, कारखानदारीत उत्पन्नाचे स्त्रोत सापडतील.
डिसेंबर जानेवारी मध्ये प्रशिक्षणात प्रशंसनीय यश मिळेल. फेब्रुवारी मार्च मध्ये प्रीतीचे धागे विणले जातील. मंगलकार्ये ठरतील. मे जून मध्ये दूरचे प्रवास, उच्चपदस्थांच्या भेटी लाभदायक ठरतील.
महत्वाचे वर्ष : 5, 14, 23, 32, 41, 50, 59, 68.
भाग्यरत्न : पाचू
याच तारेखेची व्यक्ती : गो. ग. आगरकर, मधुकर तोरडमल, ओम शिवपुरी