सासऱ्याने सुनेचा केला विनयभंग ; चौघांवर गुन्हा

0
80
सोलापूर : सासऱ्याने सुनेचा हात पकडून तिची छाती दाबुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याची घटना सोलापूरात घडली.याप्रकरणी पीडित महिलेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली.त्यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की,घरात कोणी नसताना सासऱ्याने सुनेचा हात पकडत तिचा विनयभंग करून सासरा,सासू,दीर व पतीवर हुंडा मागत महिलेचा छळ केला आहे.फिर्यादी महिलेचे आरोपी पतीसोबत काही महिन्यांपूर्वीच रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता.त्यानंतर पती, सासु,दीर यांनी माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी तिला शिवीगाळ करत तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला.त्यानंतर सासऱ्याच्या सांगण्यावरून सुनेला इंजेक्शन दिले.त्यावेळी इंजेक्शन देत असताना व तसेच घरात कोणी नसताना सासऱ्याने फिर्यादी सुनेचा हात धरून,तिला जवळ ओढत तिच्याशी झोंबाझोंबी करत छाती दाबली.पीडित सुनेने आरडा ओरडा केल्यानंतर सासरा निघून गेला.त्यानंतरही अनेक वेळा आरोपी सासर्‍याने असे कृत्य केले.त्यानंतर सुनेने ही बाब तिच्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु,पती ऐकणार नाही म्हणून घडलेली घटना सांगितली नाही.दरम्यान उर्वरित आरोपींनी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा मानसिक छळ केला.अशा आशयाची फिर्याद पीडित महिलेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून, घटनेचा तपास पोलिस करत आहेत.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई काळे या करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here