शक्तिमानमधील खलनायकाला कोरोनाची लागण; डॉ. जयकॉल मागतोय प्लाझ्मा

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अतिशय वेगानं संसर्ग फैलावत असून,मुंबई,पुण्यासारख्या शहरात रुग्ण संख्या वाढत आहे. मुंबईत या लाटेनं बॉलिवूडलाही घेरलं असून,अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं दररोज समोर येत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर छोटा आणि मोठा पडदाही गाजवणारे अभिनेते ललित परमू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या उपचारासाठी तातडीनं प्लाझ्माची गरज असून,निर्माता,दिग्दर्शक हंसल मेहतायांनी प्लाझ्मादात्यांना आवाहन केलं आहे. शक्तिमान या लोकप्रिय मालिकेतील डॉ. जॅकाल म्हणून ललित परमू यांची खास ओळख आहे.

ललित परमू यांना भाईंदर-मीरा रोड भागातील एका कोविड उपचार केंद्रात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं असून,त्यांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर तातडीनं प्लाझ्मा उपचार करण्याची आवश्यकता आहे. त्याकरता निर्माता हंसल मेहता यांनी काल रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदतीची हाक दिली आहे. ‘अभिनेता ललित परमू प्रमोद महाजन हॉलमधील आयसीयू कक्ष पाचमध्ये भरती असून,त्यांचा रक्तगट ए पॉझिटीव्ह(A )आहे. कृपया मदत करा,’ असा संदेश त्यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.

आपल्या कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या ललित परमू यांनी अनेक मालिका,चित्रपट यामधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 1997 मध्ये प्रसारित झालेल्या मुकेश खन्ना यांच्या शक्तिमान या गाजलेल्या मालिकेत डॉ. जॅकाल ही खलनायकाची भूमिका अतिशय गाजली होती. या भूमिकेमुळे छोट्या पडद्यावर त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. शक्तिमान शिवाय आहट,कोरा कागज,साया,सीआयडी,रिश्ते,रिमिक्स अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. हैदर,एजंट विनोद,मुबारकां,हजार चौरासी की मां अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या कामाची प्रशंसा झाली आहे. 2013 मध्ये आलेल्या हैदर(Haider)या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. अलीकडे आलेल्या स्कॅम(Scam)या वेबसिरीजमध्ये त्यांनी सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

अभिनयाशिवाय उत्तम लेखक(Writer)म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. मै मनुष्य हूं या नावाचे एक पुस्तक लिहिलं आहे. अभिनयाचे प्रशिक्षण देणारी एक संस्थाही(Acting School)ते चालवतात. प्रदीर्घकाळ अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या ललित परमू यांचे असंख्य चाहते असून,त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी अनेकांनी प्रार्थना केली असून,आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *