विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवत केला अत्याचार, नग्नवस्थेत काढले विवाहितेचे फोटो

0
108
सोलापूर : विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटणा सोलापुरात घडली.याप्रकरणी पीडित महिलेने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून तेजस राहुल बनसोडे (वय-२० रा.भवानी पेठ,सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी की,वीस वर्षाच्या पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.पीडित महिला ही वीस वर्षाची असून, २०१७ साली विवाह झाला होता.तिची ओळख आरोपी तेजस बनसोडे सोबत झाली.आरोपी बनसोडे याने पीडित महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे,मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगितले.व पीडितेला मोबाईल घेऊन दिले.त्यानंतर त्याने पीडित महिलेला लॉजवर नेऊन अत्याचार केला.प्रत्येक वेळी अत्याचार करताना नग्न अवस्थेतील फोटो त्यांनी काढले.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई मांजरे हे करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here