वाहनावर महाराष्ट्र शासन लिहून गांजा तस्करी

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

धुळे : महाराष्ट्र शासन असे स्टिकर असलेल्या वाहनातून होणारी गांजा तस्करी मोहाडी पोलिसांनी उघडकीस आणली. या प्रकरणी मुंबईच्या अंधेरीमधील दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश राजगुरु यांना शिरपूरहून मालेगावकडे जाणा?ऱ्या कारमधून गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राजगुरु यांनी उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, मुख्य हवालदार राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राह्मणे, शाम निकम, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ यांच्यासह मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान टोलनाक्याजवळ सापळा लावला. महाराष्ट्र शासन असे स्टिकर लावलेली कार टोलनाक्याजवळ येताच पोलिसांनी तिला थांबण्याचा इशारा दिला. परंतु, कार मालेगावच्या दिशेने सुसाट गेली. यामुळे पोलिसांना खात्री झाली. त्यांनी पाठलाग करुन पुढे कार थांबविली. कारची झडती घेतली असता त्यात ४० हजार रुपये किमतीचा १० किलो १६१ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या प्रकरणी वाहनासह कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी इरफान युसूफ अन्सारी आणि रिहान हानिफ कुरेशी (रा.अंधरी, मुंबइर्)अशी त्यांची नावे सांगितली. त्यांच्याकडून कारसह गांजा, भ्रमणध्वनी असा तीन लाख ४३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हवालदार प्रभाकर ब्राम्हणे यांनी दिलेल्या तक्रोरीवरून दोघांविरुध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कारवर महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती आम्हांला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. हा गांजा मुंबईला जात असल्याची माहिती तपासातून उघड झाली. गांजा नेमका कुठे जात होता, त्याची माहितीही घेण्यात येत आहे.  – चिन्मय पंडित (पोलीस अधीक्षक, धुळे जिल्हा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *