मोबाईलवर आय लव्ह यु चा संदेश पाठवत महिलेचा विनयभंग ; तरुणावर गुन्हा

सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) महिलेच्या मोबाईलवर आय लव्ह यु चा संदेश पाठवत महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक महिती अशी की,पिडीत महिलेचा आरोपी रमीज रफिक शेख (रा.मोदी,सोलापूर) हा मागील सहा वर्षापासून पाठलाग करत होता.सोबतच पिडीत महिलेच्या मोबाईलवर आय लव्ह यु,आय मिस यु असे संदेश पाठवत,आपल्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची फिर्याद पिडीत महिलेने दिली आहे.याबाबत आरोपी रमीज शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *