मंगळवेढा राज्यस्तरीय संगीत संमेलनात भक्तीसंगीत सत्राच्या अध्यक्षपदी पखवाजवादक ज्ञानेश्वर दुधाणे*
*शास्त्रीय संगीत सत्राचे अध्यक्ष डॉ. प्रसाद कुलकर्णी*
करकंब
मंगळवेढा तृतीय राज्यस्तरीय संगीत संमेलनात भक्तीसंगीतसत्राच्या अध्यक्षपदी पखवाज वादक ज्ञानेश्वर दुधाणे. तर शास्रीय संगीत सत्राच्या अध्यक्ष पदी डॉ प्रसाद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
ज्ञानेश्वर दुधाणे व प्रसाद कुलकर्णी दोघेही प्राथमिक शिक्षक असुन संगीत क्षेत्रातील ही जोडी संगीत प्रचार प्रसाराच काम मनोभावे करत आहेत.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायक पं शौनक अभिषेकी यांचे बरोबर महाराष्टभर तसेच दिल्ली हरीयाणा जम्मू काश्मीर. छत्तीसगड. कर्नाटक.गुजरात.अशा विविध राज्यात पखवाज साथ केली आहे.याचबरोबर नामवंत गायक राहुल देशपांडे.आशाताई खाडीलकर. पं जयतीर्थ मेऊंडी. देवकी पंडीत.आरती अंकलीकर. आनंद भाटे पं रोणु मुजूमदार पं रघूनंदन पणशीकर. मंजूषाताई पाटील.आदी गायकांना ही पखवाज साथ केली आहे.
ज्ञानेश्वर दुधाणे यांच पखवाजाच प्रारंभिक शिक्षण पं तात्यासाहेब मंगळवेढेकर. पं शंकराप्पा मंगळवेढेकर यांचेकडे झाले. नंतर पं दुर्गाप्रसाद मुजूमदार व पं कै गोविंद भिलारे यांचेकडे झाले .आता गुरुबंधू आकाश तुपे यांचेकडे चालू आहे.याशिवाय करकंब मध्ये श्री राम प्रतिष्ठान चौंडेश्वरी मंदीर ट्रस्ट व नादब्रह्म कला फांऊंडेशन व पं विकास कशाळकर फांऊंडेशन च्या माध्यमातून करकंब व पंढरपूर मध्ये नामवंत गायकांचे कार्यक्रम.नारदीय कीर्तन महोत्सव ही गेले अनेक वर्षे करीत आहेत.तसेच त्यांना आजपर्यत कलेच्या माध्यमातून शिवरंजनी कला गौरव पुरस्कार. पंढरीचा कलासाधना मंडळ संस्थेचा कलागौरव पुरस्कार.कै.बाबुराव जी डिसले जीवन गौरव पुरस्कार. कलाक्षेत्रात मिळाले असून शिक्षणक्षेत्रातही जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार. पंचायत समिती पंढरपूर आदर्श शिक्षक पुरस्कार. दलित पँन्थर आदर्श कलारत्न आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच संस्कारभारती रांगोळीच्या माध्यमातून ही अनेक ठिकाणी रांगोळी काढून तसेच परीक्षक म्हणून काम केले आहे. तसेच डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी वारकरी संगीत या विषयात पी.एच.डी.मिळवली असून विशारद.अलकांर.परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गंधार क्लासेचच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. तसेच पं विकास कशाळकर फाउंडेशन चीही स्थापना याच दोघांनी मिळून केली.अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून काम केले आहे. या कामाची दखल घेत मंगळवेढा  राज्यस्तरीय संगीत व साहित्य संमेलनामध्ये भक्ती संगीत सत्राच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर दुधाणे तर डॉ प्रसाद कुलकर्णी शास्त्रीय संगीत सत्राच्या अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे.अशी घोषणा संमेलन संयोजक श्री कल्पेश कांबळे यांनी केली.संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिल सावंत.सुरसंगमचे प्रमुख दिगंबर भगरे.म.सा.प.दामाजीनगर शाखाध्यक्ष प्रकाश जडे.नाट्य परिषदेचे मंगळवेढाअध्यक्ष सुभाष कदम आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here