बार्शीत तीन लाखाचा गुटखा जप्ततरीही गुटखा विक्री जोमाने सुरूच

सोलापूर

बार्शी : बार्शीतील लता टॉकीज जवळील किराणा दुकानाच्या पाठीमागील खोलीत ठेवलेला सुमारे२लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा जप्त करून जाकीर मुस्तफा चौधरी रा घर नंबर ३५२८ राऊळ गल्ली बार्शी या आरोपीच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास ए एस आय अजित वरपे करीत आहेतसविस्तर माहिती अशी की, दि २७ जानेवारी रोजी शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बतमीदारा कडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वरील ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी बादशहा नावाच्या गुटख्याच्या तीन पोते, राजनिवास नावाच्या गुटख्याच्या३१ गोण्या आणि जाफराणी जर्दाच्या ३२ गोण्या असा एकूण २ लाख ९६ हजार रुपयांचा गुटखा मिळून आला आहे हा माल जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर यांच्या फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेइतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडून कारवाई करण्यात आली असली तरीही शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात अगदी राजरोसपणे गुटखा विक्री आणि वाहतूक सुरू आहे शहरात विशेषतः टाकणखार रोड आडवा रस्ता आणि सुभाष नगर इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे तरी याबाबत अन्न व औषध प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *