जिल्हाध्यक्ष भूमिगत, समर्थक ताटकळत, कार्यकर्ते अंधारात

0
0
जिल
 प्रथम क्रमांकाने पास झालेले ‘ दादा ‘  फेल गेले, जिल्हा कॉग्रेसची दयनीय अवस्था 
दक्षिण सोलापूर  —-  कॉग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या गादीवर  अकलूजचे दादांना बसविले. पद घेतल्या नंतरच्या कांहि दिवस कामकाज सुरळीत चालले, बैठकावर बैठक झडत गेले, पक्ष वाढीसाठी नेतेसह, कार्यकर्ते गांवोगांवी फिरत राहिले, नेत्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तसे इकडे कार्यकर्ते अन् समर्थकात जीवात जीव आले. असेच दोन- तीन महिने होत राहिले. आता काय ?  दादा भूमिगत झाले, समर्थक ताटकळत बसले, अन् कार्यकर्ते अंधारात चाचपडत राहिले अशी प्रतिक्रिया खुद्द कॉग्रेस कार्यकर्त्यातून बोलताना ऐकावयास  मिळत आहे. त्यामुळे  प्रथम क्रमांकाने पास झालेले ‘ दादा ‘  फेल झाल्याची चर्चा जिल्हयात सुरु झाली आहे.
        दादानी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतले तेव्हा कॉग्रेस भवनाबाहेर फटाक्याचा कानठळ्या आवाज अन् आत टाळ्याचा कडकडाट.  जिल्ह्यात काँग्रेस प्रथम क्रमांकावर आणू म्हणत नेत्यांची व्यासपीठावर आश्वासनांची खैरात. दुसरीकडे  कार्यकर्त्यांची वाढलेली कुजबुज.  सुरुवातीला बैठकावर बैठक झडत गेले, दौ-यावर दोरे वाढत राहिले. आयत्या बिळात नागोबाना जिल्हा कार्यकारिणीवर निवड करून निष्ठावंताचे मन दुखविण्यात धन्यता मानले. हे सर्व असो, परंतु  सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची पडघड वाजू लागले आहेत.पक्षवाढीसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी व भाजपा बैठकांवर बैठक घेत आहेत. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना फोडले जात आहेत. त्यामुळे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी, भाजपा आणि इतर पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे बलाढ्य असलेल्या काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची वेळ येत आहे. हे दुर्दैव म्हणावे लागेल.
            केवळ काँग्रेस सोडून गेलेले नेते आणि कार्यकर्त्या मुळेच इतर पक्ष स्ट्रॉग होताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दादा तुम्ही , मुंबई, दिल्ली, दौरे थांबवा काँग्रेस पक्षाच्या हितासाठी प्रत्येक तालुक्यात   जावा, गांवा- गावांत शाखा उघडा, आपल्या सोबत असलेल्या जिल्हा कार्यकारीणीला आदेश दया, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा, तालुकास्तरीय बैठक लावा, अजून अनेक तालुक्याचे कार्यकारणी झालेले नाहीत त्यांना कार्यकारणी करण्याचे आदेश द्या, विशेष करून  तरुणांना सोबत घ्या, जुन्यांना साथ दया,  त्यामुळे पक्ष वाढीसाठी संधी  मिळेल. दादा  गेल्या दोन महिन्यापासून काँग्रेस भवनातील आपली खुर्ची रिकामी दिसत आहे.  आपल्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आहे. हे विसरून चालणार नाही.अनेक कार्यकर्ते आपली वाट पाहत आहेत अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये आपला पक्ष  नंबर एकवर कसे  आणता येईल यांचे नियोजन करा, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कॉग्रेसचा झेंडा फडकवा बस एवढेच !
                           ………………………..
काँग्रेसजिल्हाध्यक्ष यांचा आरंभशूरपणा, अनेक तालुका कार्यकारणी प्रलंबित, कार्यकर्त्याची अवस्था तळ्यात की मळ्यात, अशी जिल्ह्यातील काँग्रेसची सध्यस्थितील दयनीय अवस्था झालेली आहे.