गर्भवती महिलेचं सिजर करण्यासाठी स्वीकारली ९ हजार रुपयांची लाचकुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

ताज्या घडामोडी सोलापूर


सोलापूर (प्रतिनिधी) गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असताना तिचं सिझर करण्यासाठी १० हजार रुपयाची लाचेची रक्कम मागून ९ हजार रुपये स्वीकारलेल्या स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बिभीषण अडगळे (वय-४०) यांना सोलापूर येथील लाचलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. डॉ. संतोष अडगळे यांच्याविरुद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार याची पत्नी गर्भवती असल्याने, त्यातच गेला प्रसूती वेदना होत असल्याने कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचं सिझर (प्रसुती) करण्यासाठी, ग्रामीण रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष अडगळे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाच मागितली. ती रक्कम तडजोडीअंती लाच म्हणून ९ हजार रुपये देण्याचे ठरले.            याप्रकरणी तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीचा शहानिशा करून शुक्रवार, दि. २९ जानेवारी रोजी कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात सापळा रचून डॉक्टर संतोष अडगळे यांना ९ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.या कामगिरीत पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी या पथकास मार्गदर्शन केले. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर संतोष अडगळे  यांच्याविरुद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची  प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.ही कामगिरी एसीबी सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती कविता मुसळे, पोलीस अंमलदार पवार, सण्णके यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *