करमाळा तालुक्यात गुरूवारी पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह

सोलापूर

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरामध्ये कोरोनाचा प्राधूर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. गुरूवारी सकाळी दोन कोरोना पॉझीटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर करमाळा येथे रॅपीड एंटिजन झटपट तपासणीमध्ये ३ जणांचा अहवाल पाॅझीटिव्ह आला आहे.असे पाच जन पाॅझीटिव्ह आढळले. रॅपीड टेस्टमध्ये २६ तपासणी करण्यात आल्या त्यामधील ३ जणांचा पाॅझीटिव्ह आले तर २३ अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली. आता करमाळा तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या १६ झाली आहे.
करमाळा शहरामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करमाळा नगर परिषदेने १६ ते १९ जूलै दरम्यान लाॅकडाऊन जाहिर केले आहे.त्याकारणाने गुरूवारी सकाळ पासून मेडीकल सोडून सर्व बाजारपेठ बंद होती. करमाळा शहरातील तसेच तालुक्यातील नागरीकांनी कोरोनाच्या वाढत्या प्राधुर्भावाला न घाबरता विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आपत्ती व्यवस्थापनसमितीने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *